१९६५ साली कामगार नेते गंगाधर ओगले यांनी साखर कामगार हॉस्पिटल संघटनेच्या माध्यमातुन व कामगारांचे वर्गणीतून १५० बेडचे ग्रामीण भागात हॉस्पिटलची स्थापना केली. त्यावेळेस २ सहकारी साखर कारखाने, २ खाजगी साखर कारखाने व दोन शेती महामंडळे होती,कामगारांची सभासद संख्या ९०००/- पर्यत होती, नंतर काळ बदलला व दोन खाजगी साखर कारखाने बंद झाली त्याचवेळेस आमचे नर्सिंग कॉलेज चालू झाले.
आमचे कामगारांचे मुलांचे नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी शहरात जात असत त्याचा होस्टेल खर्च कॉलेज खर्च त्यांना परवडत नव्हता त्यासाठी आम्ही २००६ ला ए.एन.एम.नर्सिंग स्कूल चालू केले. त्यात ग्रामीण भागातील शेतकर्याची मुले कामगारांची मुले येऊ लागली त्यांचा निकाल १००% लागला व चांगल्या शहरातील हॉस्पिटल यामध्ये नोकऱ्या मिळून चागल्या त्यानंतर २०११ ला जी.एन.एम.नर्सिंग स्कूल चालू केले व त्याचाही चांगल्या प्रतीसाद मिळाला प्रवेश लगेच होत होते.
यानंतर आंम्ही २०१७ रोजी बी.एस.सी.नर्सिंग कॉलेज चालू केले व त्याचेही प्रवेश झाले, यातून ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या प्रकारे प्रकरचे वैद्यकीय शिक्षण देणे गरीबातील गरीबास चा फायदा घेऊन त्यांच्या कुटुंबाची प्रगती होते हा आमच्या हॉस्पिटल व कॉलेजचा हेतू आहे. यातून अनेक मुले, मुली मोठ-मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स, मेल नर्स म्हणून चागल्या पगारावर काम करत आहे.
श्री. ज्ञानदेव भगवंतराव आहेरकार्यकारी विश्वस्तसाखर कामगर हॉस्पिटल, श्रीरामपूर |